नांदेडनायगाव

नायगाव डॉक्टर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम ; भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन खा रवींद्र चव्हाण.

नायगाव :

सात दिवस नायगाव शहरात विविध विषयावर आरोग्य शिबिर घेऊन नायगाव डॉक्टर असोसिएशन ने स्तुत्य उपक्रम राबवला ,या आरोग्य सप्ताहाचा समारोप शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करून जनतेच्या प्रति आरोग्य सेवा देऊन आपले योग दान डॉक्टर असो.दाखवून दिले असे विचार खा रवींद्र वसंत चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडताना व्यक्त केली.                                     सामाजिक समतेचे प्रणेते मा. स्व.आ. बळवंतराव अमृतराव चव्हाण व स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त डॉक्टर असोसिएशन नायगाव यांच्या वतीने सात दिवसीय मोफत आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “दानात दान महादान – रक्तदान” या घोषणेला साजेसा भव्य रक्तदान शिबिराचा उपक्रम डॉ विश्वास चव्हाण यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.या मध्ये ७२ रक्त दात्त्यानी आपले रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.                               या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब हे उद्घाटक म्हणून हजर होते. रक्तदान शिबिरात युवक, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.           या प्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, संजय आप्पाजी बेळगे, भगवानराव लंगडापुरे, डॉ. मधुकर राठोड, रमेश पाटील शिंदे, श्रीधर पाटील चव्हाण, बालाजी देसाई, तसेच डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मंडळी व नायगाव तालुक्यातील पत्रकार बांधव, रक्तदाते युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, नायगाव डॉक्टर असोसिएशनने समाजाप्रती असलेली आपुलकी आणि जबाबदारी अधोरेखित केली आहे.हा उपक्रम यशस्वी करण्या साठी डॉ गुलाब वडजे, डॉ.डी.एस. शिपाळे ,विश्वास चव्हाण,या सह सर्व डॉक्टर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!