
माहूर :
राष्ट्रसंत संताजी जगणाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त दिनांक ८ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी सकाळी १०.०० वाजता कपिलेश्वर धर्मशाळा, माहूर येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती सोहळ्यास समस्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाजाचे जेष्ठ नेते नारायण सुर्वे यांनी केले आहे. विविध सामाजिक बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडेल नागोराव सुर्वे यांनी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

