
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील मौलाली दर्गा प्रसिद्ध मानला जातो हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मौलाली दर्ग्याची आख्यायिका मोठी आहे. ४०० वर्षे जुनी या दर्ग्याचे परंपरा आजही लोक भक्ती भावाने साजरी करतात. मोहरम च्या पहिल्या सवारीपासून ते दहावीपर्यंत गावामध्ये सर्व मोहरम ताजीया सण उत्साहात साजरा केला जातो. एकूण पाच दिवस यात्रा भरते नवस फेडण्यासाठी खोबराची उधळण कंदुरी सोने चांदे दागिने असे ,दान ,उधळण केले. जात असून सदर देवस्थान हे नवसाला पावणारे असल्याचे सर्वत्र आख्यायिका आहे . कुंटूर परिसरात व नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्रातील धार्मिक एकात्मतेचा संदेश देत भाविकांत कुंटुर , नायगाव येथील मौलाली दर्गा प्रसिद्ध आहे .येथे हिंदू आणि मुस्लिम सर्व जाती धर्माचे भाविका दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात अंदाजे 400 वर्षांपूर्वी या दर्ग्याची स्थापना झाल्याचे भाविक सांगतात. पंचक्रोशीतील प्रसिद्धी या दरगाची आख्यायिका सांगितली जाते. निजाम कालीन दर्ग्याची निगा राखणे ही आवश्यकता आहे.
कुंटूर येथील मौलाली दर्गा ची निजामाच्या एका राजानी पंजा आणुन कुंटूर येथे स्थापना केली आसल्याची माहीती महेंद्र माकुरवार पुजारी यांनी सांगितले. आजही हैदराबाद येथील निजामाच्या काळातील एक राजाचे वंशज यांनी दरवर्षी न चुकता सोन्याचे पंजा सेहरा आणुच कुंटूर येथे मोहरमॅ सण साजरा केला जातो.
पुजारी लिंगोजी महाराज सिंपि ( 1692)2) साहेबराव माकुरवार 3) बाबासाहेब माकुरवार 4) जयराम लिंगोजी महाराज पुजारी( 1779) 5) रामचंद्र पिराजी महाराज पुजारी (1868)6)श्रीधर महाराज माकुरवार( 1940)7) मोहन जयराम माकुरवार, महेंद्र माकुरवार पुजारी 2023-25. आजपर्यंत पुजारी म्हणून सेवा करत आहेत.
1आमची सहावी पीडी पासुन मौलाली दर्गा ची सेवा करित आहोत. मौलाली एक मुस्लिम संत होते हैदराबाद येथील वानुळ बिनोला येथुन मौलाली चे भक्त लिंगोजी जयराम महाराज यानी प्रथम कुंटूर येथे स्थापना केली. 400 वर्षी पुर्वीच्या गोष्ट आहे. आजही हैदराबाद येथुन मौलाली भक्त श्री मोहनलाल धात्रक वंजारी यानी दर वर्षी सवारीचा पंजा सेहरा पोस्टाने पाठवत आहेत. दर्गा मधे चार सवारी आहेत . मुख्य सवारी महेंद्र जयराम माकुरवार- मौलाली सवारी धरतात.
2 कदम मौलाली- ची सवारी -खाजामिया बाबान सबसे,आमचा पाच पिडया पासुन आम्ही धरत असतो. आमचे वाढवढील परंपरागत मौलाली दर्गा ची सवारी धरूत होते. माझे वय 64 वर्ष आहे मी आजपर्यंत सवारी धरली आहे- शेख खाजामिया बाबनसाब., खलील हैदरसाहब शेख,साहेबराव गुणाजी बरबडेकर, मौलाली येथील दर्ग्यावरील चार सवाऱ्या मुख्य आहेत.
4आमचा धर्म आमचे काम पीडयान पीडया बकरे हलाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नवस फेडण्यासाठी आलेल्या कंदोरी साठी आम्ही फक्त बकरे कापुन देण्याची काम करत होते. माझ्या पाचही पीडया ह्याच मौलाली दर्गा ची कुरबानीचे देण्याची ताबेदारी करत आहेत.
3 मौलाली सवारी समोर आम्ही डोली धरण्याची परंपरा कायम राखली आहे. मानकरी म्हणून आम्ही आमच्या पाचही पिडया डोली धरण्याची व ती डोली पुर्ण गावातुन फिरवण्याची परंपरा कायम आहे. __भगवान नागण निलेवार वय 62 भोई समाज.
5आमच्या पाचही पीडयान पिडया मौलाली सवारी समोर हलकी पुंगी चार सुरया वाजवत आहोत. आमच्या पंजोबानी सांगितले की मौलाली जागृत देवस्थान आहे. परंपरागत आम्ही मौलाली ची सेवा म्हणून सवारी समोर वाद्य वाजवण्याची सेवा करीत असतो.वाघ खेळण्याची परंपरा आम्ही करत आहोत. मौलाली स्वारी समोर पुर्वी जीवंत वाघ पकडुन खेळवत असत तीच परंपरा म्हणून वाघासारखे रंगुन आम्ही मौलाली सवारी समोर खेळत आहोत आमचाही पाच पिडया पासून हेच काम सेवा म्हणून करत आहेत. – – नयुम महम्मद आली सय्यद. वय 56
मौलाली दर्गा ही भव्य पुरातन काळातील सदरील दर्गा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
दर्गा समोर उजव्या बाजूला पुरातन विहीर आहे. या विहिरीचे पाणी गोड आहे . अनेक वेळा दुष्काळात पडला तरी पण या आडाचे पाणी आटले नाही. लोकांची तहान भागविली कितीही दुष्काळ पडला तरी आडाचे पाणी कमी होणार नाही हे विशेष सत्य आहे. या दर्ग्यावर सर्वधर्मीय लोक भक्तिभावाने येतात आंध्रप्रदेशातून सवारिचा पंजा व ईतर साहित्य दरवर्षी मोहरम निमित्त येत असत. सहावी चा दिवसी सवारी देव बसतात दरवर्षी कंदोरी नवस केला जातो. सोने चांदी खोबरे साखरेचे पेडे तोरण आसा विविध प्रकारचे दान दिले जाते.
पुर्वी चा काळी सवारीचा समोर रस्त्यावर भींत बांधून रस्ता बंद केले. तेल बंद केले ऊद दिलै नाही तेव्हा मौलाली सवारी यानी पायाचा बोटानी सर्व भींत नसट केली व बारव विहिरीचे पाणी टाकुन मशाली पेटविल्या आणी पांढरी माती जाळून ऊध तयार केल्याने हा चमत्कार सर्व जाती धर्माच्या लोकांना पाहिलं व समजले तेव्हा पासुन जागृत देवस्थान म्हणून कुंटूर चा मौलाली दर्गा प्रसिद्ध माणला जातो. मोहरमॅ सणात भाविकांची गर्दी असते. येथे भक्तांची सेवेसाठी शौचालय भक्तनिवास प्रसादालय अंतर्गत दरगाची सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. दर शुक्रवारी उपवास केला तर नवसाला पावणारा मौलाली असेही बोलले जाते. महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ऐतिहासिक वारसा म्हणून दर्गा बारव विहरी जतन करावा. या मौलाली दरगाची तीर्थक्षेत्राचा यादित समाविसट करुन विकासनिधी द्यावा अशी मागणी पुजारी महेंद्र जयराम माकुरवार यांच्या सह कुंटूर येथील ग्रामस्थांनी व भक्त गणांतुन केली जात आहे.
कुंटूर :- अनिल कांबळे

