
नायगाव शहरातील मार्केट यार्ड येथील नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेल्या गणरायाची आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापना करण्यात आली श्री गणरायांची पालखीत वाजत गाजत मार्केट यार्ड मध्ये पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत स्थापना करण्यात आली. 1975 पासून चालत असलेली अखंड परंपरा जोपासत आज स्थापना झाली
गणरायाची स्थापना पूजा आरती आदि कार्यक्रमाने ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्थापना करण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण तंटामुक्त समितीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव पाटील चव्हाण नायगाव नगरपंचायत चे नगर उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण खरेदी विक्री संघ चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण माजी जि प सदस्य संजय आप्पा बेळगे नायगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण ब्रह्मानंद देसाई देविदास पाटील बोमनाळे भगवान पाटील लंगडा पुरे बाबुराव पाटील लंगडापुरे प्राध्यापक जीवन पाटील नगरसेवक पांडुरंग पाटील चव्हाण सामाजिक कार्यकर्ते माणिक दादा चव्हाण प्रसिद्ध उद्योजक वसंत सावकार मेडेवार चंद्रकांत सावकार कौतिक वार बाबू सावकार अरगुलवार संगम सावकार कवटीकवार सतीश मेडेवार श्रीनिवास गडपल्लेवार गजानन चौधरी पत्रकार शंकर पाटील लाब्दे साईनाथ वसंत सावकार विनोद गंजेवार सूर्यकांत कवटीकवार कैलास कवटीकवार सचिन सावकार चिद्रावार सूर्यकांत उपलंचवार गंगाधर पाटील कल्याण नरेश आरगुलवार अनिल चिंतावार, शंकर चव्हाण, गणेश पाळेकर, प्रल्हाद बोमनाळे, संजय बोमनाळे यासह नायगाव शहरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते

