
कुंटूर
कुंटूर परिसरात ड्राय डेच्या दिवशीही अवैध देशी व विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. कायद्याने अशा दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद असणे अपेक्षित असतानाही दारूबाजांनी सर्रासपणे दारूची विक्री सुरू ठेवली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कुंटूर पोलीस, उत्पादक शुल्क विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. प्रशासनाने बंदी आदेश असतानाही उघडपणे दारू विक्री सुरू राहणे हे कुंठे माशी शिंकली या कडे दुर्लक्ष मानले जात आहे. नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

