
शंकर पाटील अडकिने
नायगाव : ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे आयुष विभागाच्या वतीने १० वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्यादेकर यांनी “गर्भसंस्कार” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पुपलवाड यांनी भूषवले. त्यांनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत ग्रामीण रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा महिलांनी मोठ्या प्रमाणावर वापराव्यात, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचा अनेक गर्भवती महिलांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. सुनील वाघमारे, डॉ. प्रियांका वानोळे तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मंजुषा वाढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील वाघमारे यांनी केले.

