ताज्या बातम्यानांदेड

दोन महिन्यांपासून होटाळा गाव अंधारात; ग्रामस्थांचा रोष,संतप्त ग्रामस्थांचा उपविभागीय कार्यालयास टाळे.

नायगाव :

नायगाव तालुक्यातील होटाळा हे गाव मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण अंधारात आहे. सतत नेमी डी पी खराब होणे व वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत होटाळा यांच्या वतीने महावितरण कंपनी, नायगाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन थातूरमातूर दुरुस्ती न करण्याने वीज टिकत नाही या तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्या साठी सोमवारी टाळे बंद करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

दिनांक २६/०६/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंगणवाडी केंद्र, शाळा, तसेच आरोग्य केंद्र यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांचे शिक्षण, शाळेतील उपक्रम, तर आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा या सर्वांवर वाईट परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर पाण्याच्या टंचाईमुळे संपूर्ण गाव त्रस्त आहे.

 

यासंदर्भात ग्रामपंचायत होटाळा यांच्या वतीने सरपंच गणेश पवार तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन सादर केले. निवेदनावर सरपंच यांची सही असून त्यासोबत ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी, होटाळा (ता. नायगाव (खे.), जि. नांदेड) यांचीही अधिकृत नोंद आहे. हे निवेदन महावितरण कंपनीकडून २८/०६/२५ रोजी प्राप्त झाल्याचे शिक्क्यासह दाखल करण्यात आले .

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.या आंदोलन वेळी अभियंता यांनी हजेरी लावून तत्काळ प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी माजी सरपंच दत्ता पाटील पवार,माजी उपसरपंच शिवाजी पाटील पवार,दिगंबर पवार,संजय बन,जेजराव पवार,आनंद ताटे,विठ्ठल पवार,गंगाराम पवार,आनंद पवार, रणजीत पवार,रणजीत पवार, परसुराम् पवार,राजेश बन, दत्ता बन, सुरेश पवार या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!