
जयकुमार अडकिने 
माहूर- जि.प. प.स. सार्वत्रिक निवडणुकांची प्रत्यक्ष रणधुमाळी माहे डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता असून निवडणूक विभागामार्फत गटाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून तालुक्यातील वाई बा. गट खुला सर्वसाधारण, व वानोळा गट ना.मा.प्र. सर्वसाधारण करिता आरक्षित झाला आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रस्थापीत राजकीय पक्षातून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक समोर येत आहेत. वाई बा. गटात शिवसेना उबाठा कडून जिल्हा प्रमुख ज्योतोबा खराटे, भाजपा कडून डॉ. निरंजन केशवे, प्रदीप गावंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट अभी. अमित राठोड भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून डॉ. सुप्रिया गावंडे, भा.क.प,मा.क.प. कडून कॉ. बाबा डाखोरे, कॉ. शंकर सिडाम आदी नावे चर्चेत आहेत. तर समनक जनता पार्टी तर्फे तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड हा उच्चशिक्षित उमेदवार उतरणार असल्याची चर्चा आहे. तर वानोळा जि.प. गटात भाजप तर्फे अड रमण जायभाये, माजी जि.प. सदस्य संजय राठोड, धरमसिंग राठोड तर कॉंग्रेस कडून एकमेव कृष्णकुमार राठोड राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून माजी.जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना शिंदे गटाकडून तालुकाप्रमुख सुदर्शन राठोड , भा.क.प., मा.क.प. कडून कॉ. अर्जुन आडे आदी नावे चर्चेत असून समनक जनता पार्टी कडून डॉ. अर्जुन पवार याना रिंगणात उतरवणार असल्याचे निश्चीत झाले असल्याची जोरदार चर्चा आहे.
समनक जनता पार्टी च्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व कष्टकरी व सामन्य नागरिकांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी ग्राउंड लेवल वर विविध आंदोलने केलेली असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी नागरिकात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. वाई बा. व वानोळा जि.प. गटात बंजारा समाजाचे प्राबल्य असून समाजासाठी गेल्या २५ वर्षापासून कार्य करणाऱ्या गोर सेनेशी समनक जनता पार्टी चा संबध असल्याने तसेच दोन्ही गटातील संभाव्य उमेदवारा पैकी प्रा. रवी राठोड यांचे भारतीय जीवन विमा निगमच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील नागरिकांशी कौटुंबिक संबध आहेत तर डॉ. अर्जुन पवार यांचे दत्तमांजरी ग्रामपंचायत ८ वर्षापासून ग्रामपंचायतच्या ताब्यात असल्याने त्या माध्यमातून व समनक जनता पार्टी च्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सर्वत्र सर्व जाती धर्मातील नागरिकांशी सलोख्याचे संबध असल्याने समनक जनता पार्टीचे उमेदवार माहूर तालुक्यातील जि.प. चा रणसंग्राम गाजवणार असल्याची जोरदार चर्चा माहूर तालुक्यात होत आहे प्रदेश सरचिटणीस प्रा.अनिल राठोड यांचे मार्गदर्शनात माहूर तालुक्यातील वाई बा. जि.प. गटात प्रा. रवी राठोड व वानोळा जि.प. गटात अर्जुन पवार कोणत्याही स्थितीत उमेदवार राहणारच हे निश्चित असल्याचा ठाम विश्वास समनक जनता पार्टीचे तालुका प्रसिद्धीप्रमुख अरविंद राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला आहे.

