
नायगाव : बाळासाहेब पांडे
बरबडा व परिसरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नायगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात नवी शक्ती निर्माण केली आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्याला खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात माजी आमदार राजेश पवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा सरचिटणीस पूनमताई राजेश पवार, प्रा. मनोहर पवार, बापूसाहेब पाटील कोडगावकर, बालाजीराव मदेवाड, श्रीहरी देशमुख, लक्ष्मण हासेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोरे टाकळीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत केले. मोरे टाकळीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नायगाव तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने कार्यरत राहणार आहे. पक्षाचे नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणी पाहूनच मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला.” त्यांच्या प्रवेशामुळे बरबडा परिसरासह संपूर्ण नायगाव मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले की, “मोरे टाकळीकर यांसारख्या तरुण, समाजाभिमुख आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल.” खा अशोकराव चव्हाण कार्यक्रमाला विविध गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिस्तबद्ध आयोजन, जोशपूर्ण घोषणाबाजी आणि विकासाभिमुख भाषणांमुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी मोरे टाकळीकर यांचे अभिनंदन करत, पक्ष व जनतेच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वातून नवे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नरसित लवकरच महा मेळावा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नरसित लवकरच होणार महा मेळावा या मध्ये आपले हजारो समर्थक भाजप मध्ये प्रवेश करतील.अशी माहिती मोरे यांनी दिली. मनोज मोरे यांच्या प्रवेशाने बरबडा जिल्हा परिषद गट निवडणुकीत त्यांची सौभाग्यवती उतरणार अशी चर्चा रंगली असून सौ मोरे याना भाजपने उमेदवारी दिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व राहणार हे आता जवळ पास निश्चित झाले आहे.येत्या थोड्या दिवसात नरसी येथे भाजपचा मोठा पक्ष महा मेळावा होणार असल्याची माहिती मनोज मोरे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ दिली आहे

