
नायगाव :- एल बी रानडे
नायगाव तालुक्यातील गडगा शिवारातील गट क्रमांक बारा मधील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींचे एकाच वेळी दोन ठिकाणांचे रात्रीच्यावेळी स्टार्टर,केबल्स भुरट्या चोरानी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून.सदरिल घटना शनिवारी (ता.२५) रोजी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने तीव्र संताप व्यक्त करित भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे., : . आगोदरच अतिवृष्टीने भाजलेल्या शेतकऱ्यांसमोर नवाने चोराने संकट उभे केले असून .मागील सात महिन्यापासून या भागातील विधुत पुरवठा पुर्णता बंद असल्याचा फायदा चोरानी घेतला आहे.विधुत पुरवठा सुरळीत असता तर चोरीचे प्रकार झाले नसते.मात्र महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागत आहे. दोन वर्षापूर्वी याच शिवारातून पोल पाडून विधुत तारे चोरीला गेले होते.परंतु अजूनही चोरांचा शोध पोलिसांना लागला नाही.या बाबींकडे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी लक्ष देवून कायमचा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा.महावितरणाने तातडीने येथील विधुत पुरवठा सुरळीत सुरू करावा.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

