कुंटूर
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोजे रुई बुद्रुक येथे गावांमध्ये चार ठिकाणी अवैध देशी दारू विक्री केली जात आहे. दारू गावात सहज उपलब्ध झाल्याने लहान ते मोठ्या पर्यंत सर्वत्र दारूच्या आहारी गेले आहेत .त्यामुळे घरातील कलह भांडणे तंटे वाढले आहेत. त्यामुळे दारू पिऊन पती ,मुले महिलांना मारहाण करत आहेत. सर्व महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन कुंटूर पोलीस स्टेशन येथे येऊन रुई बुद्रुक येथील गावातील अवैध देशी दारू बंद करून गावात दुकाने ठेवू नये गावाच्या बाहेर हद्दपार करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे . पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी महिलांना आश्वासन दिले येत्या दोन दिवसांमध्ये रुई बुद्रुक येथील दारू दुकान देशी दारू दुकान बंद करून रुई बुद्रुक गावात देशी दारू हद्दपार केले जाईल असे आश्वासन दिले. गावातील मोल मजुरी करून चार पैसे घरात आणून संसार चालणाऱ्या महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पती पत्नीचे भांडण तंटे मुला मुलींचे संसार उपयोगी वस्तू विकून पती , मुले, दारू पिऊन ते मारहाण करत आहेत . संतप्त झालेल्या महिलांनी एकच नारा देत कुंटूर पोलीस स्टेशन येथे येऊन रुई बुद्रुक येथील गावातील अवैध देशी दारू बंद करा असा एकच नारा धरला व पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात रूई बुद्रुक येथील अवैध देशी दारू बंद करण्यात येईल अशी आश्वासन महिलांना दिले. रूई बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी सुद्धा गावातील अवैधदेशी दारूचा धुमाकूळ झाला असल्याची माहिती दिली. बंद करण्यात यावे असा ग्रामपंचायतीचा ठराव देण्यात आला व सर्व महिलांना यावेळी अवैध देशी दारू पिऊन घरच्या मंडळीकडून होणारा त्रासाचे माहिती महिलांनी पोलीस स्टेशन येथे दिले. रुई बुद्रुक येथील दारू काही दिवसात बंद होऊन महिलांना दिलासा मिळेल असे आश्वासन कुंटूर पोलीस स्टेशन कडून मिळाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी निवेदन देऊन गावाकडे निघाले यावेळी गावातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामध्ये एकूण 70 महिलांनी निवेदनावर सह्या करून पोलीस स्टेशनला अर्ज सादर केले आहेत .

