ताज्या बातम्यानांदेड

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सर्व रोग निदान शिबिराचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन !

  1. जयकुमार अडकिने

माहूर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत या अभियाना अंतर्गत आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत दिं २६ रोजी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे सह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थितासमोर बोलताना आमदार भीमराव केराम यांनी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून येथे गेल्या पाच वर्षात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी प्रास्ताविकात केलेली ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या मागणीला प्रतिसाद देत भविष्यात उपजिल्हा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार असल्याने येथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत कमी पडू नये असे आवाहन केले. यावेळी रमेश बद्दीवार, रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांचे सह मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी सेविका आधी परिचारिका परिचारिका मान्यवर महिलांचा झाडांचे रोपटे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान करण्यात आला तसेच रुग्णालयात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कक्षांचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण कुमार वाघमारे डॉ राजाभाऊ गुट्टे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश माचेवार, डॉ ओमप्रकाश साबळे,डॉ अक्षय सांगळे, डॉ कैलास चव्हाण,डॉ बिपीन बाबळे,डॉ अंजली पाटील,डॉ साईनाथ, डॉ जाधव यांचे सर दीडशेवर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिपरिचारिका परिचारिका कर्मचारी शिबिरात आलेल्या हजारो रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!