ताज्या बातम्याधार्मिकनांदेड

सद्गुरु दत्ता महाराज वसमतकर यांची १९वा पुण्यस्मरण सोहळा श्री.आनंद दत्तधाम आश्रम माहूरगड येथे संपन्न.

माहूर :-  जयकुमार अडकीने

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्री.आनंद दत्तधाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड येथे दि.23जून रोजी सद्गुरु दत्ता महाराज वसमतकर यांचा एकोणीसावा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्वक साजरा करण्यात आला. सर्वप्रथम

दत्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माहूर किनवट चे आमदार भीमराव केराम व नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या शुभहस्ते या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

तदनंतर स्वच्छता दूत महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी कीर्तनातून सर्व भक्तांना आपल्या अमृतवाणीतून जीवनाचे रहस्य,दत्तात्रेय महाराजांचे नामस्मरण करावे.जीवनाचा उद्धार करण्यासाठी सर्वात मोठा मंत्र तो म्हणजेच दत्तगुरूचे नास्मरण होय. ते नामस्मरण घेऊनच मी पुढे चालत मग चालत राहणार आहोत.असे आपल्या कीर्तनातून संबोधित केले.

त्या आशीर्वादाच्या बळावर मी पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे असेही ते म्हणाले.

तसेच सर्व भक्ताचे माहूर वासियांचे पत्रकार बांधवांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे.

दत्त नामाचा पताका घेऊन सर्व महाराष्ट्र भ्रमण करणार आहे..

असंख्य भक्तगणांना तब्बल तीन तास आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अमृतवाणीतून सर्वांना बोध केला.माझ्या आश्रमाला दिलेला हा जो रस्ता फिरोज दोसाणी नगराध्यक्षांनी नगरपंचायत फंडातून दिला आहे. याची सुद्धा आठवण करून दिली.

यावेळी माहूर किनवट चे आमदार भीमराव केराम यांनी साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सप्तसुत्रीचा अमंल सर्व स्तरांतून केल्यास समाज कल्याणकारी घडेल व देशकल्याण साधता येईल असे संबोधत महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत म्हणजेच ब्रॅण्ड अम्बेसिटर राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांचे अभिनंदन व कौतूक करत समाजसेवेसाठी मी महाराजांचे आशिर्वाद घेऊन मी पुढे जातोय असे गौरवोद्गार काढले.

यावेळी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी अभिवादन करत येणाऱ्या काळात महाराज यांच्या सप्तसुत्रीस नगर विकासाचे सुत्र बनवू असे अश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेषराव पाटील यांनी केले.यावेळी

यावेळी आमदार भीमराव केराम, माहुर चे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मारोतराव रेकुलवार,नगरसेवक,गोपु महामुने, प्राचार्य राजेंद्र केशवे, किशोर जगत,रमेश बद्दीवार, संजय राठोड, अनिल वाघमारे, निळकंठ मस्के,भाऊराव पाटील हडसणीकर, जवाहरलाल जयस्वाल, पुंडलिक हुंबे,रमेश तमखाने,वैभव खराटे, संतोष मते, अमृतराव ढोले, ऋतू भांगे, अनिल बाभळे,यांच्यासह अनुयायी व पत्रकार यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!