
जय कुमार अडकिने
माहूर – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये
गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके,शेतजमिनी पाण्याखाली आले असून काहींचा संसार हा उघड्यावर पडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अनेकांनी आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन सरकारने। केले आहे. यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील संस्थाने पुढे आली आहेत. त्यातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं येथील श्री रेणुका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी एक लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधी निधीत जमा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दस्तूरखुद्द माहूर गडावर येऊन घोषित केले आहे. माहूरगड विकास आराखड्यातील प्रलंबित कामे। लागणार मार्गी…!
नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळेनिमित्त आज ता. ३० रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सहपत्नीक दर्शनासाठी आले होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, शासनाने माहूरगड विकास आराखडा मंजूर केलेला असून फक्त हाय पॉवर कमेटी मिटिंग बाकी असून ती लवकरच घेण्यात येणार आहे, त्यानंतर गडावरील प्रलंबित कामे निश्चितच मार्गी लागणार असल्याचे सांगितले आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा असलेला स्काय वॉक लिफ्टचे काम पाच हजार फूट पॉईंटने वाढणार असून त्यासाठी व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. शासकीय आराखड्याचा जीआर आल्यानंतर प्राधान्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स पार्किंग व निवास व्यवस्थेचे काम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करून काय वॉक लिफ्टचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, ज्यामुळे वयोवृद्ध लोकांसाठी देवीचे दर्शन सुलभ होणार असल्याने सांगितले आहे, तसेच श्री रेणुका देवीचे परम भक्त वि ॥ कवी यांच्या रेणुकादेवी वरील एकवीस काव्यरचना संगीतबद्ध पद्धतीने जतन करण्यात आले असून, त्या रचना देवीच्या चरणी अर्पण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी देवीचे दर्शन सुलभ होणार असल्याचे सांगितले आहे, तसेच श्री रेणुका देवीचे परम भक्त विष्णू कवी यांच्या रेणुकादेवी वरील एकवीस काव्यरचना संगीतबद्ध पद्धतीने जतन करण्यात आले असून, त्या रचना देवीच्या चरणी अर्पण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. या वेळी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सुचविलेले संस्थानाच्या मालकीचे ई-रिक्षा व सुलभ शौचालयाच्या बाबतीत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारींनी सांगितले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी प्रसादायालयात भाविकांना प्रसादाचे वाटपही केले. जिल्ह्यातील महसूल व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन जवळपास अडीच कोटी होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे, कर्मचाऱ्यांच्या यापाऊलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रक्कम जमाकरण्याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी राहुलकार्डिले यांनी माहूरगडावरून केलेली असून,त्यांनी जिल्ह्यातील इतर देवस्थान व सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.


