ताज्या बातम्यानांदेड

कार मोटर सायकलची समोर समोर धडक ; पायाचे हाड मोडल्याने एक गंभीर यवतमाळला हलविले ; माहूर गडावरील श्री रेणुका देवी श्री दत्त शिखर मार्गावरील गरुड गंगा जवळ घडली घटना.

श्रीक्षेत्र माहूर  : जयकुमार अडकिने

माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर ते श्रीदत्त शिखर संस्थान कडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुड गंगा नाल्यावरील पुलाजवळ भाविकांची येणारी कार आणि मौजे दत्त मांजरी कडे जाणाऱ्या मोटर सायकल स्वाराची समोरासमोर धडक झाल्याने मोटर सायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याचा उजवा पाय कंबरे खालून मोडल्याची गंभीर घटना दि 5 रोजी दुपारी 3.40 वाजता घडली आहे.                                  मौजे जोडगव्हाण ता मालेगाव जि वाशिम येथील भाविक आपल्या घरची कार क्रमांक एम एच 26 बी एक्स 4991द्वारे चालक चेतन गोवर्धन सोलव हे घरच्या मंडळींना घेऊन माहूर गडावर दर्शनासाठी आले होते शिखर संस्थांनचे दर्शन करून परत येत असताना गरुडगंगा पूला जवळील वळणावर मौजे दत्त मांजरी तालुका माहूर कडे जात असलेले परमेश्वर राऊत राजू पवार हे शारदा देवी विसर्जनासाठी कुंकू चा थैला घेऊन आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 26 ए डब्ल्यू 64 14 वरून जात असताना वळणावर अचानक पणे समोर आलेल्या कारला मोटरसायकलची जोरदार धडक बसली यामध्ये परमेश्वर राउत खाली पडून त्याला गंभीर मार लागल्याने उजव्या पायाचा कमरेखालून हाड मोडला घटना कळल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके पोउपनि पालसिंग ब्राह्मण पोहेका गजानन चौधरी दत्ता सोनटक्के पवन राऊत संघरत्न सोनसळे होमगार्ड एस पी भगत यु बी भगत सलमान खान मजीद खान पी एस मुरकुटे शेख गणी यांनी धाव घेऊन जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले .   रुग्णालयात डॉ अक्षय सांगळे यांचे सहपरिचारिकांनी प्रथमोपचार करून 108 अंबुलन्स द्वारे पुढील उपचारासाठी जखमींना यवतमाळ येथे हलविले माहूर घाटात दिवसेंदिवस भाविकांच्या वाहनांची संख्या वाढत असल्याने तात्काळ रस्ता रुंदीकरनाचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!