गुन्हेगारीताज्या बातम्यानांदेड

सतच्या पावसाने उभ्या पिकावर तणनाशक फवारल्याच्या वादात शेतकऱ्याचा मृत्यू.

माहूर, : जयकुमार अडकिने

सतच्या पावसाने उभ्या पिकावर तणनाशक फवारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माहूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.                               मृत शेतकरी माणिक गंगाराम मडावी (वय ८५, रा. मुरली शिवार) असे असून, त्यांचा मुलगा महादेव मडावी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी आरोपी सिलेमान हाशम शेख (५५), मोसीन मजीद शेख (२५), गुड्डू उर्फ वसीम मजीद शेख (२३) व मतीन सुलेमान शेख (२४, सर्व रा. पडसा) यांनी मडावी यांच्या शेतातील पिकावर तणनाशक फवारून नुकसान केले. हे नुकसान मृत माणिक मडावी यांनी पाहिले होते.       याबाबत जाब विचारल्याने आरोपींनी त्यांना व रोजंदार शेख रसूल यांना जीवघेणी धमकी दिली होती. त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता आरोपींनी मडावी यांना शेतातच बेदम मारहाण केली. छाती व पोटात झालेल्या मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी प्रथम माहूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. मात्र, २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.                                                                  या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५२, ३५१(१), ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.                                                                माहूर : सतच्या पावसाने उभ्या पिकावर तणनाशक फवारल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्ध शेतकरी माणिक मडावी (वय ८५, रा. मुरली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.                                                                      या प्रकरणी सिलेमान हाशम शेख, मोसीन मजीद शेख, वसीम मजीद शेख व मतीन सुलेमान शेख (रा. पडसा) या चौघांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!