ताज्या बातम्यानांदेड

म.पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने आ. आ.भिमराम केराम यांना निवेदन.

माहुर—म.पुरोगामी प्रा.शिक्षक संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार व सर्व आमदार यांना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट -माहुर मतदार संघाचे आ.भिमराम केराम यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. त्यातील प्रमुख मागण्या टीईटी परीक्षा 2013पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना सूट मिळावी.15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा, शिक्षकांना बी. एल. ओ. अशैक्षणिक कामातून मधून मुक्त करावे, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, शिक्षणसेवक पद रद्द करावे, 100 पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे. आदी विषयांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर राज्य नेते विजय भोगेकर,राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य कोषाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, जि. विभागीय उपाध्यक्ष समर्थ एकाळे,जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे पाटील, जिल्हा सरचिटणीस मनोहर पेठकर, जिल्हा कोषाध्यक्ष नागनाथ बसापुरे, जिल्हा प्रमुख संघटक सुरेश पाकलवाड, जिल्हा प्रमुख सल्लागार बी. एन.कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष व्हि. व्ही. आमनवाड, जिल्हा सहसचिव शंकर शृंगारे, भोकर तालुकाध्यक्ष केशव कदम आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!