
माहूर – माहूर शहरातील वार्ड क्र. १ मध्ये साई मंदिर परिसर व बि.एन. नगर मध्ये बिबट्याच्या मुक्त संचार होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मुक्त वावर करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन नगर सेवक प्रा. विलास भंडारे यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर व वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना सादर केले आहे. निवेदनाच्या अनुशंगाने नगर पंचायत प्रशासनातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना सूचना पत्र देऊन मुक्त वावर करीत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना दिली आहे

