
नांदेड दि.08/10/2025. गुरु गोविंदसिंग क्रिडा संकुल बॅटबिंटन हाॅल नांदेड येथे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड यांनी आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री शंकरराव चव्हाण मा.व उ.माध्यमिक विद्यालय आष्टा ता.माहुर चा 19 वर्षे वयोगटातील मुलींचा कबड्डी संघ उपविजेता ठरला आहे. संघातील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनींचे अभिनंदन श्री तुकारामजी केशवे शिक्षण संस्था आष्टा चे अध्यक्ष श्री बाबारावजी केशवे ,सचिव श्री अनंतरावजी केशवे व शाळेचे प्राचार्य श्री. राजेन्द्रजी केशवे सरांनी केले. कबड्डी संघाला मार्गदर्शन शाळेचे शिक्षक श्री एन.एम . कन्नलवार सर ,तालुका क्रिडा समीतीने क्रिडा संयोजक डि.डि चव्हाण सर व प्रेम चव्हाण सर यांचे लाभले.

