
माहूर- जयकुमार अडकीने
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उद्योग- संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प.पू.श्री. योगी श्याम भारती महाराज हे मान्यवर उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे माहूर चे तहसीलदार अभिजीत जगताप यांची उपस्थिती होती तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी एन जाधव माहूर पोलीस स्टेशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य जयकुमार अडकीने,आय एम सी सदस्य संजय सुरोशे, सतीश कान्नव व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, सय्यद ईसा यांची उपस्थिती होती. माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली, तुम्ही फक्त प्रमाणपत्रासाठी शिक्षण घेऊ नका तर एक सक्षम बना, तुमचे कौशल्य दाखवा यासाठीच शासनाने नवीन युवा पिढीला एक संधी म्हणून या नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली. कार्यक्रमादरम्यान राज्यसभा खासदार मा. अशोकराव चव्हाण यांनी शुभेच्छा संदेश पाठविला असता कर्मचारी एन.बी. चिरडे यांनी मान्यवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी वृंद यांच्यासमोर त्यांनी वाचून दाखविला. पी एम विश्वकर्मा लाभार्थी श्री दीपक भगवान मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पीएम विश्वकर्मा लाभार्थी दीपक मुंडे यांनी विश्वकर्मा योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशिका ए. एन. पोतदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सुरक्षारक्षक यांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाले.

