ताज्या बातम्यानांदेडनायगाव

अनुलोम माध्यम व संघ प्रेरणेचा हृदयस्पर्शी उपक्रम ; सेवा करणाऱ्याची सेवेची दिवाळी!

नायगाव :

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि माणुसकीचा सण. याच माणुसकीचा दीप प्रज्वलित करत अनुलोम माध्यम आणि संघ प्रेरणा यांनी यंदा एक वेगळी, अर्थपूर्ण दिवाळी साजरी केली.                                                                      नरसी येथील दोन महिला, ज्या कचरा वेचून आपली उपजीविका करतात, त्या दिवाळीच्या दिवशी रस्त्यावरून जात असताना, अनुलोम माध्यमच्या प्रतिनिधींनी त्यांना सन्मानपूर्वक घरी बोलावले.                                         त्यांना स्वच्छ हातपाय धुवायला लावून घरातील सोफ्यावर बसवण्यात आले आणि घरगुती फराळ देऊन आत्मीयतेने सण साजरा करण्यात आला.                                          या दोन महिला सासू-सून असून, सुनेला चार मुली व एक मुलगा आहे. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे टाकाऊ वस्तू गोळा करणे. फराळ झाल्यानंतर त्यांना आहेर देऊन त्यांच्या लेकरांसाठीही फराळाचा वाटा देण्यात आला.                 त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहूनच खरी दिवाळी साजरी झाल्याचा आनंद अनुलोम माध्यमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.                                                             त्यांनी सांगितले की, “आपल्या समाजात असे अनेक परिश्रमी लोक आहेत, ज्यांच्या हातांनी आपल्या परिसराची स्वच्छता टिकते. त्यांच्याही घरी प्रकाशाची एक दिवा जावा, यासठी हा छोटासा प्रयत्न.”.                                                    सेवेची संधी मिळाली… हीच खरी दिवाळीची भेट 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!