
नायगाव :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंटूर सर्कलमधील मौजे हुस्सा (ता. नायगाव) येथे ग्रामस्थांशी संवाद साधत मतदारांचा आढावा घेतला आणि सुसंवाद साधला. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी घरकुल योजना, नाले व रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी स्थानिक प्रश्न होटाळकर साहेबांसमोर मांडले. गावातील विकासकामे गतीमान करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमास गावातील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती अशोकराव पा. हंबर्डे (पोलीस पाटील), शरद पाटील हंबर्डे, बाबुराव श्यामजी पाटील हंबर्डे, गंगाधरराव पाटील हंबर्डे, शंकर आबाजी पाटील हंबर्डे, रमेश रामराव पाटील हंबर्डे (सरपंच), रामदास दशरथ पाटील हंबर्डे, प्रल्हाद पाटील हंबर्डे, बाबू पाटील हंबर्डे, व्यंकटराव किशनराव पाटील हंबर्डे, व्यंकटराव पाटील जालनेकर, जगन्नाथ पाटील शिंदे, शिवाजी पाटील शिंदे, मधुकर पाटील हंबर्डे, अंबादास पाटील हंबर्डे, यादव कारागीर, दत्तराम लोकडोजी पाटील, विलास पाटील जालनेकर, लक्ष्मणराव पाटील हंबर्डे, प्रकाश पाटील हंबर्डे, उत्तम पाटील हंबर्डे, सोनाली ताई हंबर्डे शिवराज पाटील, संतोष पाटील हंबर्डे, साहेबराव पाटील देगावे, भाऊसाहेब पाटील, महेश पाटील, गजानन पाटील, पांडुरंग तुकाराम वाघमारे, आनंदराव तुकाराम वाघमारे, मारुती जकोजी वाघमारे, सुरेशराव वाघमारे, दिगंबराव वाघमारे, संजय वाघमारे, दत्तात्रेय वाघमारे, दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे, शिवाजीराव वाघमारे, यादवराव वाघमारे, अशोक पांडुरंग वाघमारे, अविनाश वाघमारे, प्रदीप वाघमारे, किशोर वाघमारे, गणपत वाघमारे, गंगाधरराव वाघमारे, गंगाधरराव जकोजी वाघमारे, दिगंबर भगवान गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे, पांडुरंग गायकवाड, नामदेव भगतकर, भगवान गायकवाड, आनंदराव गायकवाड, दिगंबरा गायकवाड, लक्ष्मणराव तेलंगे, भगवानराव पाटील हंबर्डे, परसराम जालनेकर, प्रदीप पाटील पवळे, आनंदराव पाटील शिंदे, माधव पाटील उपासे, पुष्पा राम पाटील (नायगाव) तसेच महिला मंडळ, मित्र मंडळ आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत होटाळकर साहेबांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या दौऱ्यामुळे हुस्सा गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

