ताज्या बातम्यानांदेडनायगाव

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव व मुखेड येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठका.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव व मुखेड येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठका —

 

नायगाव / मुखेड

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारांची तयारी व संघटनात्मक बळकटीसाठी उद्या, दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी, दोन महत्त्वपूर्ण आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

पहिली बैठक सकाळी ११ वाजता मुखेड येथे — नवीन मोंढा परिसरात, तर दुसरी बैठक दुपारी २ वाजता नायगाव येथे — मिलेनियम पब्लिक इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पार पडणार आहे.

या दोन्ही बैठकींना लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब अध्यक्षस्थानी राहणार असून, या कार्यक्रमांना माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, महानगराध्यक्ष आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, सुभाष साबणे, मोहन अण्णा हंबर्डे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, वसंतराव सुगावे, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, व विक्रम देशमुख हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.        या आढावा बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांशी चर्चा, पक्षाची रणनीती, संघटनशक्ती व मतदारसंघनिहाय तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.                                    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब यांनी दोन्ही बैठकींना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!