
जयकुमार अडकिने
माहूर – गोर सीकवाडी गोर सेनेच्या वतीने दि.२४ व २५ नोव्हेंबर दोन दिवस हातनी रोड माळेगाव ता. दारव्हा येथे समस्त बंजारा समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास देशातील १६ राज्यातून देशभरातील बंजारा समाज बांधव करोडोचे संख्येने उपस्थित राहणार आहेत.
माहूर तालुक्यातील प्रत्येक तांड्यावर जाऊन गोर सेनेच्या वतीने जनजागृती करण्यात आली असून समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या विविध अडचणी व समस्येबाबत प्रबोधन करण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यातील प्रत्येक तांड्यातून समस्त बंजारा बांधव मेळाव्यात उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती गोर सेना तालुकाध्यक्ष आशिष राठोड यांनी दिली.
यावेळी जिल्हा सचिव डॉ. अर्जुन पवार, तालुका सचिव प्रल्हाद राठोड, समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड, तालुका प्रसिध्दी प्रमुख अरविंद राठोड, आदी उपस्थित होते.

