ताज्या बातम्यानांदेड

पाचुंदा दुहेरी हत्याकांडातील अज्ञात आरोपीचा पोलिसांनी घेतला 24 तासात शोध !; पोलिसांची धडक मोहीम फत्ते ! दोन आरोपी अटक एक मोटरसायकल व दोन मोबाइल जप्त.

माहूर – जयकुमार अडकीने

दि 20 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन माहुर हथीत मौजे पाचदा येथे मयत नामे अंतकलाबाई अशोक अडागळे वय 35 वर्ष व अनुसयाबाई साहेबराव

अडागळे वय 50 वर्ष या दोघी शेतात कापूस वेचणी करीत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघीचा गळा दाबून जिवे मारुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे

व चांदीचे दागिणे असा मुद्देमाल चोरुन नेले बाबत पोलीस स्टेशन माहूर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, किरण भोंडवे उप विभागीय पोलीस

अधिकारी माहूर, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पो.स्टे. माहूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक

जाधव पो.स्टे. सिंदखेड यांनी घटनास्थळी भेट देवून तात्काळ गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उदय खंडेराय, पोलीस

निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील चार टीम नेमून एक

टीम व एक टीम यवतमाळ तसेच दोन टीम उपविभाग माहुर व किनवट येथे पाठविण्यात आल्या होत्या. तसेच आरोपी शोध कामी साक्षीदार यांचे

कडून तात्काळ माहीती हस्तगत करून संशयीत आरोपीचे व्हिडीओ कॉलींगव्दारे पुणे येथून तज्ञाव्दारे स्केच तयार करण्यात आले.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि बाहुळे, पो. उप निरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार असे वरिष्टांच्या

आदेशाप्रमाणे आरोपीचा किनवट व माहर उपविभाग येथे शोध घेत होते. तसेच संशयीत आरोपीचे स्केच वरून आरोपीची माहिती घेत असतांना दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी रवि वाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत आरोपी नामे दत्ता सुरेश

लिंगलवार रा. सदा सावळी ता आणी जिवतमाळ हा गंगाजी नगर, सेल करंजी ता.माहूर जि. नांदेड येथील त्याचे नातेवाईकाच्या शेतातील अखाडयावर

लपुन बसला आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे,

पो.उप.निरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जावून सापळा लावून आरोपीस ताब्यात घेवून त्याचे

नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्ता सुरेश लिंगलवार वच 38 वर्ष व्यवसाय बेकार रा. सदोबा सावळी ता. आणी जि.यवतमाळ असे असल्याचे

सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र गजानन गंगाराम बेरजवार वय 41 वर्ष व्यवसाय

सुतारकाम रा. गंगाजीनगर, करंजी ता माहूर जि.नांदेड यांनी दोघांनी मिळून केल्याचे सांगितले. वरुन आरोपी दत्ता लिंगलवार यास दुसऱ्या आरोपी गजानन हा

कोठे राहतो याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गावाच्या खाली सगळ्यात शेवटी राहतो असे सांगुन त्याचे घरी घेवून गेला असता दुसरा आरोपी गजानन

रजवार हा सुध्दा मिळुन आला त्यास विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांनी गुन्हयात वापरलेली एक मोटार सायकल व दोन

मोबाईल गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहेत. दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशिर कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन माहूर यांचे ताब्यात देण्यात

आले असून गुन्हयातील मुद्दे माला बाबत अधिक तपास करीत आहेत. सदर गुन्हा उघडकिस आणणे कामी यवतमाळ पोलीसांनी देखील चांगले सहकार्य केले.

सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणणारे उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्था.गु. सा नदिड व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच यवतमाळ

  1. पोलीस यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगीरी पार पाडल्याने अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!