ताज्या बातम्यानांदेड

माहूर मध्ये संविधान वाचनासह शहिदांना श्रद्धांजली ; संविधानाचे वाचन; मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन.

श्रीक्षेत्र माहूर

26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक, पोलीस आणि जवानांना माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संविधान वाचन कार्यक्रमही घेण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक देविदास चोपडे म्हणाले, “शहीद झालेले वीर आपल्या मायभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देऊन गेले आहेत. या हल्ल्याला जरी १७ वर्षे झाली असली, तरी त्या वेदनादायी आठवणी आजही ताज्याच आहेत. शहिदांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव म्हणाले, “दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे आणि समाज एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.”

या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी सभापती वसंत कपाटे, पद्मा गिऱ्हे, हाजी कादर दोसानी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विनोद कांबळे यांनी संविधानाचे वाचन केले.

कार्यक्रमास नगरसेवक विजय कामटकर, रफीक सौदागर, राजू सौंदलकर, आकाश कांबळे, निसार कुरेशी,रणधीर पाटील, इरफान शेख, सुमित खडसे, विक्रम राठोड, अफसर आली,सुमित खडसे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, ‘पॉवर ऑफ मिडिया’चे इलियास बावानी, राज ठाकूर, जयकुमार अडकीने, सिद्धार्थ तामगाडगे, सुरेखा तळळणकर, जयंत गिऱ्हे, अमजद पठाण वाईकर, अमित येवतीकर, राजू चव्हाण, इम्रान सुरय्या, आशू पठाण, डी. डी. चव्हाण, सुनील आडे, शुभम पराते, वाजीद शेख, करीम कुरेशी, सलीम शेख, सत्तार शेख, अल्ताफ शेख, शेख अयाज, विकास राठोड यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!