
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
पोलीस उपमाहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार मिशन प्लश् आउट अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तालुक्यात हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करणे यासह देशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत माहूर पोलिसांनी गुंडवळ येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून चोरट्या मार्गाने देशी दारू विक्री करणाऱ्या पकडून दोघाविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची घटना दि 28 रोजी घडली आहे
मौजे गुंडवळ येथे एक इसम देशी दारूचा अड्डा उभारत असल्याची माहिती तसेच आणखी एक इसमाने देशी दारू अवैधरित्या विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती पोलिसांना लागली होती त्या अंतर्गत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके यांचे सह पोलिसांनी अचानकपणे गुंडवळ येथील नाल्या शेजारी धाड टाकली असता हातभट्टीची दारू काढण्यासाठी फसफसते 500 लिटर रसायन आणि इतर साहित्य जमा करून ठेवलेले दिसून आले त्यामुळे रसायन नष्ट करून दारू बनविण्याचे इतर साहित्य जाळून टाकण्यात आले आणि एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर गुंडवळ येथीलच एका घरात तीस बॉटल देशी दारूच्या अवैध मार्गाने विक्रीसाठी ठेवलेल्या मिळून आल्याने या ठिकाणीही धाड टाकली असता देशी दारूच्या 30 बाटल्या मिळून आल्याने त्या बॉटल जप्त करून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हातभट्टी चे रसायन जप्त करून एका विरुद्ध तर देसी दारू अवैधरित्या बाळगल्या प्रकरणी एका विरुद्ध अशा दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके यांचे सह पोहेका गजानन चौधरी पोना प्रकाश गेडाम महिला पोका शिवनंदा जाधव होमगार्ड देशमुख आणि शिंदे पोलीस पाटील यांचे प्रतिनिधी सामील होते

