
श्रीक्षेत्र माहूर
देशभरात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाखो लाभार्थ्यांना पारंपारिक कारागिरांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण तसेच व्यवसाय करण्यासाठी आधुनिक साधने मोफत देण्यासाठी बनविण्यात आलेल्या योजने अंतर्गत माहूर शहरातील नाभिक बांधवांना आधुनिक साधनांचे दि 1.12.2025 रोजी सब पोस्ट मास्तर विलासराव श्रीमनवार पोस्टमन सौरभ सेवनकर यांच्या हस्ते बालाजी तळणकर माहूर यांना घर पोहोच देण्यात आले
पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जी नाभिक तसेच इतर पारंपरिक कारागिरांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि आधुनिक साधने पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, नाभिक कारागिरांना व्यावसायिक कौशल्ये सुधारण्यासाठी प्रशिक्षण, व्यवसायासाठी तारणमुक्त कर्ज आणि कामासाठी आवश्यक साधने पुरवली जातात, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते
या योजनेअंतर्गत माहूर येथील बालाजी तळणकर संतोष शिंदे हडसनी यांना कटिंग मशिन, ड्रायमशिन हेअर ,केश मशिन,हेअर मशिन ,हेअर कोट , दाढी ब्रश कटिंग कैची , हेअर ग्लोज, क्लिप पिन कटिंग मशीन, हेअर ब्रश ,कंगवा कटिंग कैची, बेल्ट साहित्या मोठी बॅग यासह इतर साहित्य शासनाकडून पोस्टामार्फत पाठविण्यात आल्याने लाभार्थ्यांनी शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे जाहीर अभिनंदन केले आहे

