ताज्या बातम्यानांदेड

श्री.मनोज दादा जरांगे पाटलांची निम्न धरण विरोधी संघर्ष समिती सोबत समाधानकारक चर्चा.

माहुर :

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा वाहनांच्या ताफयासह दोनशे शेतकऱ्यांनी आज मराठा संघर्ष योध्दा श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे त्यांच्या राहत्या घरी दुपारी बारा वाजता भेट घेतली. ही भेट त्रिशुल पाटील यांच्या मध्यस्थीने घडवून आली. तब्बल दोन तास निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रत्येक बाजूवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मनोज दादा जरांगे पाटील यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाची प्रत्येक बाजू समजून घेतली.

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना या प्रकल्पा बाबत लोकांचा विरोध असल्याचे कळविले तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण जलसंपदा मंत्री ना.गिरिश महाजन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत धरण विरोधी संघर्ष समितीची बैठक लावून देऊ असे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी धरणं विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, प्रल्हादराव गावंडे सर, बंडू नाईक, बंटी पाटील जोमदे, उत्तमराव भेंडे, गजानन डाखोरे, भगवतीप्रसाद तितरे यांच्यास दोनशे लोकं उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!