ताज्या बातम्यानांदेड

प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविणाऱ्या यशस्वीता प्रमाणेच इतर क्षेत्रातील यशस्वीतांचे पण सत्कार व्हावे – तहसीलदार अभिजित जगताप.

जयकुमार अडकिने

माहूर- प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविणाऱ्या यशस्वीताप्रमाणेच इतर क्षेत्रातील यशस्वीतांचे पण सत्कार व्हावे जेणेकरून त्यामुळे त्यांना पण त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन माहूर चे तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले. मौजे टाकळी येथे अजय संजय घाळवट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्या बद्दल टाकळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच कुंडलिक तोडसाम, प्रमुख पाहुणे माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप , भाजप युवा नेते डॉ. निरंजन केशवे, जगदंबा महाविद्यालय माहूरचे प्राचार्य विश्वासराव जाधव, माजी सरपंच नामदेवराव पाटील, जेष्ठ पत्रकार जयकुमार अडकीने, तंटामुक्ती अध्यक्ष भागवत जायभाये, भाजप युवा नेते विनायक मुसळे, माजी सरपंच लक्ष्मण घुले, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर चेवटे, कृषी सहायक करुणा दामोदर, सत्कारमूर्ती अजय घाळवटचे माता पिता सौ. इंदूताई व संजय घाळवट, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष महेंद्र घाळवट, ग्रा.प. सदस्य सुनील घाळवट, गंगाबाई तोडसाम व समस्त ग्रा.प. सदस्य आदींच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती अजय घाळवट व त्यांचे माता पिता सौ. इंदूताई व संजय घाळवट यांचा ग्रामपंचायत टाकळी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा, अभिनंदन व कौतुकपर मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलतांना तहसीलदार जगताप म्हणाले की, सध्या वाढत्या खाजगीकरणामुळे शासकीय नौकऱ्याची संख्या घटत असल्याने प्रत्येकालाचा नौकरी मिळणे शक्य नाही. तर शासकीय नौकरी व्यतिरिक्त उद्योग व इतर अनेक क्षेत्रात सुद्धा खूप संधी आहे. विद्यार्थ्यांनी नौकरीसाठीच शिक्षण हा भ्रम दूरू करून आपण घेतलेल्या शिक्षणाचा व्यापार उद्योग व ज्या ज्या क्षेत्रात संधी आहेत अशा इतर क्षेत्रात पण करीअर निवडावे. तसेच प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविणाऱ्या यशस्वीता प्रमाणेच इतर क्षेत्रातील यशस्वीतांचे पण सत्कार सोहळे घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्राम पंचायत अधिकारी व्ही.एस.जाधव, यांनी केले सूत्रसंचालन उपसरपंच प्रतिनिधी फयाज फारुकी यांनी व आभार प्रदर्शन माजी सरपंच लक्ष्मण घुले यांनी केले. याच सोहळ्यात किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक अजय घाळवट यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी जि.प. प्रा.शाळा टाकळीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बालक व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!