
नायगाव :
नायगाव पंचायत राज दिनाच्या औचित्य साधून नरसी शहरात विकासकामांना गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शहरातील बुद्धविहार येथे सुशोभीकरण कामाचा प्रारंभ कष्टकरी महिलांच्या शुभहस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक व धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढण्यासोबतच परिसराच्या एकूण विकासाला चालना मिळणार आहे.
लोकप्रिय युवानेते खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांच्या विकास निधीतून हे काम हाती घेण्यात आले असून नरसी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शहरातील नागरिकांमध्ये या कामाबाबत समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमासाठी जिल्हा काँग्रेसचे कर्तव्यदक्ष कार्याध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नरसी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून अशा विकासकामांची मालिका पुढेही सातत्याने राबविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सामाजिक एकात्मता आणि नागरिकांच्या सहभागातून विकासाची गती अधिक वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास गंगाधर भेदे, सुनील भेदे, अमोल कांबळे, बुद्धभूषण मेले, रवि भेदे, जबार खान, अनिल पवळे यांच्यासह जनाबाई भेदे, देवशाला भेदे, रेखाबाई भेदे, रमाबाई भेदे, कलूबाई कांबळे, सविता भेदे, संध्याबाई भेदे, सुनीता भेदे, लक्ष्मीबाई भेदे, कमलबाई भेदे, ज्योती भेदे, भारतबाई भेदे, नागरबाई भेदे, भीमाबाई भेदे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या हस्ते शुभारंभ झाल्याने कार्यक्रमाला विशेष सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.
नरसी शहराच्या विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे समन्वयाने प्रयत्न सुरू असून आगामी काळातही अशाच विविध विकासकामांद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



