ताज्या बातम्यानांदेड

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले.

पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच!.

माहूर : जयकुमार अडकिने

माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदी पत्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड काळे पेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत तीन तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दि 17 रोजी 1 वाजता घडली आहे

माहूर शहरासह तालुका भरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवूत वाळू तस्करी दिवस-रात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाऊन्सर च्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे

वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून बाई बाजार वानोळा कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली यांना चोले पेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने येथे ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल ढाकुलकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योती दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे त्यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले त्यांनी पाहणी केली असता त्यांना येथे तीन तराफे आढळून आले त्यामुळे नदीपात्रात जाऊन तीन तराफे नदी काठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले तसेच नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले

माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळीचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्नी शस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!