ताज्या बातम्यानांदेड

मतदार दिनाची शपथ कार्यक्रम संपन्न ; सर्व शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली मतदार दिनाची शपथ.

श्रीक्षेत्र माहूर   :  जयकुमार अडकिने

भारत निवडणूक आयोग अंतर्गत मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना पत्र काढून मतदार दिनाची शपथ घेण्याचे सुचित केल्याने माहूर तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात मतदार दिनाची शपथ दि 25 रोजी घेण्यात आली

भारत निवडणूक आयोग अंतर्गत मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य कडून मतदार दिन साजरा करण्याबरोबरच मतदार दिनाची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या अंतर्गत माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी गटविकास अधिकारी मुख्याधिकारी उप अधीक्षक भूमि अभिलेख दुय्यम निबंधक बालविकास प्रकल्प अधिकारी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका कृषी अधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वन परिक्षेत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी या विविध कार्यालयात मतदार दिनाची शपथ घेण्याचे सूचित केले होते त्यानुसार शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला

यावेळी मुख्य मतदार दिनाची शपथ कार्यक्रम माहूरच्या तहसील कार्यालयात पार पडला यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांचे सह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!