
शलालसिगं रानडे
नायगाव :- नायगाव तालूक्यातील गडगा येथील मांजरम रोड शेजारी असलेल्या अण्णा भाऊ साठे समाज मंदिरासमोरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकून समाज मंदिर समाजाच्या ताब्यात द्यावे.अशी मागणी होत आहे.येथील मुख्य प्रवेश ठिकाणी अतिक्रमण झाले आहे.
सदर समाज मंदिर हे वस्तीवाढ परिसरातील समाजाच्या धार्मिक व सामाजिक वापरासाठी होते.या संदर्भात समाजाच्या वतीने अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अतिक्रमण हटवून समाज मंदिर अधिकृत ताबा समाजाला द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
जर मागणीची दखल घेतली गेली नाही, तर शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

