ताज्या बातम्यानांदेडनायगाव

प्रजासत्ताक दिनी घरकुल लाभार्थ्यांना दिलासा ; नायगाव नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी बैठक संपन्न.

नायगाव : बाळासाहेब पांडे

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नायगाव नगरपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) मंजूर लाभार्थ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. विजय पाटील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आली असून, कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. श्री. रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना पुढील कार्यपद्धती, अनुदान वितरण, बांधकामाची टप्प्याटप्प्याने पूर्तता तसेच योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः वृद्ध व गरजू लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्ष अर्चनाताई चव्हाण, एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. केशवराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास पाटील चव्हाण, नगरपंचायत गटनेते श्री. सुधाकर पाटील शिंदे, श्री. प्रदीप पाटील कल्याण यांच्यासह सन्माननीय नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

प्रमुख उपस्थितीत बोलताना खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सामान्य व गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचे सांगितले. नगरपंचायतीने लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनीही लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मंजूर घरकुलांची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. नगरपंचायत प्रशासन लाभार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेली ही बैठक घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक व मार्गदर्शक ठरली, तर नगरपंचायतीच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचेही दर्शन घडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!