ताज्या बातम्यानांदेड

मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार .

श्रीक्षेत्र माहूर  :

कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे पहिल्या वर्षीचे मुकाबले जगभर गाजले असून यावर्षी दि 14 ते 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यात तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या देखरेखि खाली कसून सराव करून तयार झालेला श्री रेणुका माता मंदिर क्रिकेट संघ सामन्यात भाग घेत असल्याने माहूरच्या नावलौकिकात भर पडणार असुन रेणुका देवी क्रिकेट संघ खेळताना चे प्रक्षेपण जगभर होणार असल्याने प्रशासक मंडळाच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे

मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ शास्त्री नगर मैदान, कोल्हापूर येथे आयोजित दुसऱ्या पर्वामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला आहे.श्री क्षेत्र जोतिबा श्री क्षेत्र नृसिंहवाडी श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी ओट्यावरचा गणपती प.म.दे.स.परशुराम सोशल फौंडेशन श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र माहूरगड श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी श्री क्षेत्र शिर्डी श्री महालक्ष्मी सारसबाग, पुणे मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीने जो आकृतीबंध स्पर्धेच्या स्वरूपासाठी निश्चित केला आहे त्याप्रमाणे मंदिर प्रीमियर लीग मध्ये कमीत कमी १ संघ हा आमंत्रित रहाणार असुन त्या संघाचा मंदिरांशी कुठल्याही प्रकारचा संबंध असेलच असे नाही. त्या आमंत्रित संघासंदर्भात कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही. या संदर्भातील सर्व अधिकार मंदिर प्रीमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट समितीकडे रहातील.एका संघामध्ये जास्तीत जास्त चौदा १४ खेळाडू असणे बंधनकारक आहेत. या चौदा १४ खेळाडुंचाच खर्च टी शर्ट, २ वेळचा चहा अल्पोपहार जेवण याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल.तसेच परगावातुन येणाऱ्या संघांच्या चौदा १४ खेळाडुंची राहण्याची व्यवस्था स्पर्धा समितीतर्फे केली जाईल.या व्यतिरीक्त ज्यादा येणाऱ्या सदस्यांची खेळाडुंची सर्व प्रकारची व्यवस्था स्वखर्चाने ज्या त्या संघांनी स्वतः करावयाची आहे. सामना सुरू होण्यापुर्वी किमान ४० मिनीटे आधी सर्व संघांनी मैदानावर उपस्थित राहून संबंधित देवस्थानांचे ओळखपत्र संमत्तीपत्र व आधारकार्ड स्पर्धा समितीला देऊन त्याची शहानिशा करणे बंधनकारक राहील.

मंदिर प्रीमियर लीग मध्ये वरील देवस्थानचे क्रिकेट संघ सहभागी होणार असून माहूर श्री रेणुका माता मंदिर विश्वस्त समितीचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रम्हे उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप विश्वस्थ चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे सह सर्व विश्वस्त व्यवस्थापक विजय राऊत योगेश साबळे हे स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कोचमार्फत क्रिकेटचे धडे देत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!