आरोग्यताज्या बातम्यानांदेड

ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या ; नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा .

जुनाट एक्स-रे मशीन बनली शोभेची वस्तू रुग्णांना बसतोय आर्थिक फटका ; काढलेल्या एक्सरेत जखमा फ्रॅक्चर दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा घ्यावा लागतो आधार 

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून बसविण्यात आलेली एक्स-रे मशीन जुनाट झाल्याने या मशीनमध्ये काढलेले फ्रॅक्चर किंवा इतर जखमा दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा आधार घ्यावा लागत असून जास्त प्रमाणात फ्रॅक्चरअसल्यास पुसद यवतमाळ येथे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका बसत असून जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ नवीन एक्सरे मशिन बसवून ऑर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या आर व्ही एक्स-रे मशीन असून ऑर्थोपेडिक सर्जन नाही महिनाभरात किमान 300 वर रुग्ण माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे करण्यासाठी येतात परंतु येथील एक्स-रे मशीन मध्ये काढलेले फोटो देण्यात येत नसल्याने फक्त स्क्रीनवर दाखवून सरळ हातात रेफर लिटर दिले जाते तर या मशीनवर काढलेला एक्स-रे चा रिपोर्ट तिसऱ्या दिवशी येत असल्याने रुग्णांनी मरावे काय असा सवाल उपस्थित होत असून येथे साधे फ्रॅक्चर किंवा हाडाला दुखापत झाल्याचेहि प्लास्टर होत नसल्याने एक्स-रे मशीन असून काहीच फायदा नाही अशी ओरड होत आहे त्यामुळे डीआर सिस्टम ची मशीन तात्काळ येथे पाठवत आर्थोपेडिक सर्जनची नियुक्ती होणे गरजेचे आहे

गडावर आलेल्या भाविकांच्या वाहनांना अपघात होऊन शेकडो भाविक दगावलेले आहेत तर सोबतच हजारो भाविकांना मार लागून गंभीर फ्रॅक्चर होतात त्यावर पृष्ठ बँडेज लावून तात्पुरती फिटिंग करून सरळ यवतमाळ केले जाते त्यामुळे येथे ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज असतानाही लोकप्रतिनिधी याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे येथे तात्काळ अद्यावत मशीन सह आर्थोपेडिक सर्जनची नियुक्ती करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार इलियास बावाणी यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!