
कुंटूर : अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल कुंतुर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचे उद्घाटन श्री श्रीमती क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी अनन्या रेड्डी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार नायगाव हे उपस्थित यांच्या उपस्थित सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकाच छताखाली कृषी विभाग आरोग्य विभाग महसूल विभाग ही पंचायत राज ग्रामपंचायत विभाग ,msrlm विभाग अशा विविध सर्व प्रमाणपत्र नागरिकांना एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आले . यावेळी अभियान महाराज शिवा अभियानामध्ये निकालने करण्यात आलेले प्रमाणपत्राचे संख्या पुढीलप्रमाणे आहे फेरफार निकाली-31, सातबारा दुरुस्ती -13 ,सातबारा डिजिटल -, 8अ उतारा 187, शिधापत्रिका -20, आयुष्यमान भारत कार्ड 113 ,सिकलसेल ची तपासणी – 110 ,गरोदर माता तपासणी -150 अभियान वितरित प्रमाणपत्र ची संख्या- 243 भूसंपादन-5, अ कृषीक परवानगी-6, असे इतर मिळून प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी ,जातीच्या प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिनल डिजिटल सातबारा, फेरफार, प्रलंबित फेरफार नवीन व्यवस्थापनुसार सनद प्रक्रिया, सामाजिक अर्थसहा योजनेच्या लाभ मंजूर करणे व विद्यार्थ्यांना दाखले देणे तसेच राष्ट्रीय श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना व संजय गांधी योजना अशा विविध योजना नागरिकांना महिलांना पुरुषांना एकाच वेळेस सर्व प्रमाणपत्राचे पूर्तता करण्यात आली . सदर कार्यक्रम सकाळी 10- वाजून 40 मिनिटांनी सुरुवात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथील सभागृहामध्ये सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी गावातील नागरिक परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर महाराजस्व अभियानाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल सर्व अधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीने परिसरातील नागरिकांची कामे वेळेवर करून देण्यात आले. शेतीचा सातबारा असो व पांदन रस्ता प्रलंबित कोणतेही कामे ठेवू नका अशी माहिती यावेळी क्रांती डोंबे यांनी आपल्या महसुली भागातील सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव तहसीलदार अनन्या रेड्डी हे उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिक व महिला शासकीय कर्मचारी कुंटूर मंडळ अधिकारी आर के पवार ,कुंटूर तलाठी बालाजी मुधळे, राहेर तलाठी बाबुराव डाकेवाड , सालेगाव तलाठी पवन कदम व परिसरातील मंडळ अधिकारी बरबडा मांजरम नरसी कुंटूर कृषी सहाय्यक पाटील, पोखरा जाधव नायगाव येथील सर्व मंडळातील कर्मचारी उपस्थित होते . तसेच महिला बचत गट उद्योग व्यवसाय करणारे स्टॉल हे लावण्यात आले. यामध्ये msrlm विभाग नायगावचे बीएम श्री प्रशांत मोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या महिला बचत गटाची घोंगडी व आवळा कॅन्डी अशा दोन गटांना भेट दिली यात कुंटूर येथील राजस्व महाभियानामध्ये गावातील नागरिकांना गावांमध्येच राशन कार्ड विभाग आरोग्य विभागातील आरोग्य कार्ड आयुष्यमान भारत कार्ड लाडकी बहिणी केवायसी आधार अपडेशन गावातील ग्रामपंचायत अंतर्गत जन्म मृत्यू प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध दाखले यावेळी वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळू दुगडूमवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आर के पवार कुंटूर मंडळाधिकारी यांनी केले आहे. सर्व कार्यक्रम यशस्वीरिते पार पडला असल्याची सर्व कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.


