ताज्या बातम्यानांदेड

माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ; वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व भोंदूगिरीच्या प्रकरणांवर तात्काळ आळा घाला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे तहसीलदाराना निवेदन.

माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व भोंदूगिरीच्या प्रकरणांवर तात्काळ आळा घाला अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती मार्फत दि३० मार्च रोजी तहसीलदार यांना सादर करण्यात आले. त्यामध्ये १) जादूटोना विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा : “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम 2013 संदर्भात पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन स्वतंत्र कक्ष स्थापन करून तसे जाहीर करावे. व त्यास प्रसिद्धी देऊन ते प्रत्यक्ष कार्यान्वित होतील याबाबत आपण संबंधितना सूचना द्याव्यात. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत प्राधिक्षण आयोजित करावे. २) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करावा: भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये व समाज पातळीवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यात अधिकृत पणे सहभागी करून घ्यावे. ३) तालुक्यातील भोंदूगिरीच्या प्रकरणांवर कारवाई व्हावी: फलज्योतिष, भविष्य, दैवी शक्ती, चमत्कार किंवा बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही जात धर्माच्या व्यक्तींबाबत पोलीस प्रशासन व आपल्या मार्फत तात्काळ तपास करून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम 2013 संदर्भात पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याबाबत व जनजागृती बाबत परिसंवाद आयोजित करण्याबाबत समितीचे शिष्टमंडळ व तहसीलदार अभिजित जगताप यांच्यात सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.

लवकरच पोलीस स्टेशन मध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष स्थापन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. तर लवकरच अंधश्रद्धा निर्मुलनाबाबत ग्रामस्तरावरील कर्मचारी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व समिती सदस्य यांचे मार्गदर्शनाकरिता परिसंवाद आयोजित करण्यात येईल असे समितीच्या वतीने ठरविण्यात आले. शिष्टममंडळात तालुकाध्यक्ष मनोज कीर्तने , कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, कादरभाई दोसानी , राजेंद्र चारोडे, जयकुमार अडकीने, साजिदखान पठान , कॉ. किशोर पवार, प्रा. प्रवीण बिरादार, राजिक शेख, सिद्धार्थ तामगाडगे. अॅड. छंदक वाठोरे, सागर कांबळे, आदींचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!