ताज्या बातम्यानांदेड

माहूर तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन  दि 2 एप्रिल रोजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

श्रीक्षेत्र माहूर :

नांदेड क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल माहुरचा भुमीपुजन सोहळा आमदार भिमराव केराम विधानसभा सदस्य तथा अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती माहूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी तालुका क्रीडा संकुल समितीचे सन्माननिय सदस्य व स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध दैनिकाचे प्रतिनिधी व विविध खेळातील खेळाडूं यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.02 एप्रिल 2026 रोजी दु. 1.00 वा. तालुका क्रीडा संकुल मैदान पांडवलेनी शासकीय आदिवासी आश्रम शाळेजवळ माहूर येथे संपन्न होणार आहे.

तालुका क्रीडा संकुल, माहूर करीता गायरान गट क्रं. 195 मधील क्षेत्र 1 हेक्टर 46 आर. शासकीय जागा प्राप्त आहे. सदर जागेवर क्रीडा सुविधेचे बांधकाम करणेकरीता रु 499.88 लक्ष रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. यामध्ये मल्टीपर्पज इनडोअर हॉल 200 मी. धावनपथ कबडडी खो-खो व्हॉलीबॉल मैदान सिमेंट रोड व इतर कामे संरक्षण भिंत वॉचमन रुम गेट व इतर पाण्याची व्यवस्था अग्नीशमक ड्रेनेज लाईन सेप्टी टँक बोरवेल व इतर अनुषंगीक कामे इत्यादी बाबीचा समावेश आहे.

सदर भुमीपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार असून तालुक्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या अदयावत क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या भुमीपूजन सोहळयास तालुक्यातील खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!