ताज्या बातम्यानांदेड

5एप्रिल रोजी प्रशासनाच्या माहूरगड नियोजनास भाविकांनी सहकार्य करावे – तहसीलदार अभिजित जगताप यांचे आवाहन!

श्रीक्षेत्र माहूर –

माहूरगड येथील श्री दत्त शिखर देवस्थानचे परमपूज्य श्री महंत मधुसूदन भारतीजी महाराज (मालक) यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच संबंधित धार्मिक विधींसाठी रविवार दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी दत्तशिखर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर, माहूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना कळविण्यात येते की, शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग तसेच इतर मूलभूत सुविधा यावर ताण येण्याची शक्यता आहे. तसेच माहूर शहर व परिसरातील अनेक आस्थापना काही काळ बंद राहण्याची शक्यता असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होऊ शकते.

सद्य परिस्थितीत होणारे ट्रॅफिक कोंडी  तसेच आरोग्य सेवा, हॉटेल्स व इतर सुविधांवर येणारा ताण लक्षात घेऊन, भाविकांनी आपल्या प्रवासाचे टप्प्याटप्प्याने नियोजन करावे. तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनामार्फत काही कालावधीत गडावरील वाहतूक नियंत्रित (Regulated) करण्यात येण्याची शक्यता असल्याने, त्यानुसारही भाविकांनी योग्य नियोजन करावे, असे नम्र आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत असून, नागरिक व भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!