ताज्या बातम्यानांदेड

ग्राम पंचायत चे 5 टक्के दिव्यांग निधी  व निराधार योजनेचे रखडलेले तातडीने द्या! अन्यथा अमरण उपोषण.

प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकध्यक्ष किशोर हुडेकर यांचे तहसीलदार व गट  विकास  अधिकाऱ्यांना निवेदन 

माहूर –

रखडलेले दिव्यागाचे मानधन तातडीने द्या व मागील , दोन ते तिन वर्षा

पासुण रखडलेला दिव्यांग 5 टक्के निधी अद्याप बऱ्याच ग्राम पंचायतने वाटप केलेला नसल्याने दिव्यांग बांधव ग्राम पंचायत मध्ये विचारणा करण्यास गेले असता त्यांना

उध्दट पणाची वागणुक वरीष्ठाकडुन मिळते. आणि बऱ्याच दिव्यांग बांधवांनाजागा नसल्यामुळे 200 स्केअर फुट जागा उपलब्ध करुन द्यावी आणि घरकुल योजने मध्ये दिव्यांग बांधवांना प्रथम प्राधान्य द्यावे ग्रा.प.ऑनलाईन

प्रणालीला ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी व रखडलेले दिव्यांगांचे निराधार योजनेचे मानधन तातडीने देण्यात यावे  अन्यथा येत्या काळामध्ये सर्व बाबी

लक्षात न घेतल्यास संघटनेच्या माध्यमातुन पंचायत समिती कार्यालयासमोर   अमरण उपोषण करणार असल्याचे  निवेदन प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने   तहसीलदार माहूर व गट विकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांना   स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत  निवेदनावर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर,तालुका सचिव गणेश देवराव आधव,शहर प्रमुख – बळवंत भावराव नागरगोजे, वाई सर्कल प्रमुख बाबसिंग ठाकुर वानोळा सर्कल प्रमुख – प्रभाकर नारायण नेवारे  दिगांबर गणपत चुकानाकर, राजु चंपत कातले, निखिल ठाकरे यांच्या स्वाक्षरी आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!