ताज्या बातम्यानांदेड

तांदळ्याच्या भूमिपुत्राची पुणे पोलिसात निवड ; पुण्यातील मित्रमंडळासह तांदळ्यात जल्लोष.

श्रीक्षेत्र माहूर

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या मौजे तांदळा येथील सय्यद हैदर सय्यद गणी यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी पुणे गाठून बिगारीचे काम सुरू केले अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांचा मुलगा सय्यद सरवर शिकवून त्याची पुणे पोलिसात निवड झाल्याने पुण्यातील मित्रमंडळासह मौजे तांदळातील त्यांचे मित्र मंडळ नातलग गावकऱ्यातून आनंदोत्सव साजरा करून त्याचे अभिनंदन केले जात आहे

माहूर तालुक्यातील मौजे तांदळा हा आती दुर्गम भागात वसलेला असून चारी बाजूने जंगलाने वेढलेले जुने गाव आहे येथे सय्यद गणीभाई यांचा मोठा परिवार राहतो त्यांचा मुलगा सय्यद हैदर यांनी तांदळात रोजगार नसल्याने त्यांनी मुलांना एक ते चार वर्गापर्यंत तांदळ्यातच शिक्षण देऊन पाचवा वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर येथे देत पुणे गाठले मुलाबाळासह पत्नींना घेऊन राहणे रोजगार मिळवून पत्नी मुलाबाळांचे उदरभरण करणे अशा परिस्थितीतही त्यांनी मुलगा सय्यद सरवर यास सहावी ते दहावी महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन पुणे अकरावी ते बारावी पद्मश्री मनीभाई देसाई कॉलेज उरुळी कांचन पुणे येथे शिकवून पुणे येथील पोलीस भरतीत त्यास पाठविले असता त्याची पुणे पोलिसात निवड झाल्याने तो पुणे येथेच पोलीस विभागात रुजू होणार आहे

सय्यद सरवर यांची पुणे पोलिसात निवडीची वार्ता कळताच पुणे येथील त्याच्या मित्रमंडळातून त्याचे जल्लोशात स्वागत करण्यात आले तर मौजे तांदळा येथे आजोबा सय्यद गणी सय्यद अब्दुल सय्यद नूर सय्यद नामदार सय्यद मगदूम शेख अब्दुल रजाक शेख मेहबूब सरपंच प्रतिनिधी संतोष जाधव आनंदराव मारुती दुमारे माजी उपसभापती गजानन जाधव देवीसिंग केशव राठोड माजी सरपंच प्रभात आनंद वानखेडे सय्यद भाई तंटामुक्ती अध्यक्ष शंकर विठ्ठल बोरकर पोलीस पाटील यांचे सह गावकऱ्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!