ताज्या बातम्यानांदेड

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खीरदान ; श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सह खीरदान कार्यक्रम संपन्न 

श्रीक्षेत्र माहूर  :

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले तर तहसील कार्यालयाचा गेटवर असलेल्या स्वर्गीय पिपळी बाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत भाऊ राठोड यांनी उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे संचालक विजय भाऊ कांबळे यांचे कडून जयंती साजरी करत आलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर खीरदान करण्यात आले

माहूर शहरात अन्नदान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले विजय भाऊ कांबळे यांच्या श्रीदत्त कृपा प्रतिष्ठान येथे झालेल्या जयंती व खिरदान कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून खीर प्राशन केली यावेळी माजी जि प सभापती संजय राठोड शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक भाजपाचे डॉ निरंजन केशवे अनिल वाघमारे ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय आमले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन भाऊ राठोड पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी पत्रकार वसंतराव कपाटे पत्रकार गजानन भारती पत्रकार दत्तात्रय शेरेकर फिरोज पठाण संजय बनसोडे एड धीरज शेंडे व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी शिवचरण राठोड संजय बनसोडे वसंत राठोड दिगंबर जोशी दिगंबर राठोड नितीन जांबुतकर कदिर बावाणी शेख सलीम प्रताप हजारे लक्ष्मीकांत उर्फ पिंटू पाटील शिवसेनेचे संघटक विनोद पाटील सूर्यवंशी बालाजी गेंटलवार उदय वानखेडे गोपाल नाईक नयनसिंह राठोड नवल वानखेडे प्राचार्य बाळू कलाने गजानन शद्दलवार तथागत मनवर दीपक ठाकूर बंडूभाऊ राठोड पालागुडाकर दयाळू जाधव बंडू चव्हाण बाजीराव जाधव यांचे सह शेकडो नागरिकांनी खिरदान कार्यक्रमाचा आनंद घेतला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले तर भव्य मिरवणुकी द्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!