
नायगाव प्रतिनिधी बाळासाहेब पांडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नायगाव शहरात भव्य अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील मुख्य चौकात आयोजित या उपक्रमात खिचडीचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद बच्चाव, सतिष वाघमारे, प्रकाशभाऊ हनमंते व साहेबराव कोपरेकर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रामतीर्थ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवराज नरवाडे यांच्या हस्ते अन्नदान कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी “ना भाला, ना बरची, ना घाव पाहिजे; बाबासाहेबांचा विचारच समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवतो,” असा संदेश देत सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला मंगेश हनवटे, नागोराव डूमणे, विलास बच्चाव, बाळासाहेब सोनकांबळे, विलास वाघमारे, संतोष भालेराव, विनोद भालेराव, नागेश भालके, प्रकाश कामळजकर, प्रल्हाद भालेराव, भिमराव हनमंते, सोनू बच्चाव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भिमशाहीर बाळासाहेब आव्हाड यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहरासह तालुक्यातील हजारो आंबेडकर अनुयायी व बहुजन बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाशभाऊ हनमंते यांनी केले. समाजातील वंचित घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या अन्नदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


