माहूर : जयकुमार अडकिने
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा या मागणीचा आग्रह धरून कुटुंबीय व नातेवाइकासह दि.१७ रोजी गोंडवडसा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे अपहरणग्रस्त मुलीच्या आईने उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांना दिले आहे.
५ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील एका गावातील कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबाबतची रोजी अपहरण झालेल्या मुलीच्या आईने यांनी संशयित याचे नावासह माहूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. माहूर पोलीस स्टेशन येथे एफआयर क्र. ०६५/२०२६ नुसार नोंद घेण्यात आली. परंतु माहूर पोलिसांनी आजतागायत सदरील एफआयआर प्रकरणी पुढे कोणतीही प्रगती केली नाही अथवा कार्यवाही केली नाही. याबाबत फिर्यादी विचारणा करण्यास गेले असता “ आम्ही तुम्हाला त्यांचा पत्ता देतो, तुम्ही तेथे जाऊन त्यांना घेऊन या !” असा उलट सल्ला देत आरोपीस पकडून आणण्यास टाळाटाळ करीत आहेत. तीन महिन्यापूर्वी मला तुझ्या मुलीचे किंवा नातीचे अपहरण करतो अशी धमकी दिली होती.
सदरील अपहरणकर्ता व्यक्ती हा लोकांच्या मुली बाळीची फसवणूक करून लंपास करण्याचा अवैध व्यवसाय अनेक दिवसापासून करतो. त्यामुळे त्यांनी आम्ही यापूर्वी सुद्धा मुलींचे अपहरण केलेले असून आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. अशी धमकी सुद्धा फिर्यादीस दिली होती. परंतु पोलिसांनी पुढे कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या अपह्रत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी कार्यवाहीचा आग्रह धरीत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांना सादर केलेल्या निवेदनात दिला असून या आंदोलनात मी सक्रीय सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रफुल जाधव यांनी दिली आहे.



