ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

मांजरम येथे शुक्रवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’.

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन.

नायगाव : बाळासाहेब पांडे

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध महसुली अडचणी सोडवण्यासाठी मांजरम (ता. नायगाव) येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता कांत्याप्पा मठ, श्री हनुमान मंदिराच्या पाठीमागे पार पडणार आहे.

या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच अकृषिक (N.A.) परवानगी, नवीन ‘सनद’ प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप यांसारख्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत..

यासोबतच तुकडेबंदी कायद्याच्या प्रकरणांचा निपटारा, घरासाठी पडझड पट्टे, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगीसंदर्भातील प्रकरणे निकाली काढण्याचे कामही या शिबिरात करण्यात येणार आहे.

महसूल विभागासोबतच कृषी, आरोग्य, वन व पंचायत समितीच्या विविध विभागांच्या सेवाही उपलब्ध असणार आहेत.या शिबिरासाठी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी क्रांती डांबे तसेच तहसीलदार डॉ. धर्मप्रिय गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!