Uncategorized

आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश; नांदेड पोलिसांचा मोठा दणका!नायगाव च्या दुकान फोडी सह आठ घरफोड्या उघड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त – सहा आरोपींचा सहभाग, चौघे अद्याप फरारनायगाव |

नायगाव | , कुंटूर, मुदखेड, पालम, पिंपळदरी, जालना आणि मुंबईपर्यंत घरफोड्या व वाहनचोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा अखेर नायगाव पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ गुन्हे उघडकीस आणत तब्बल ₹४ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर चार आरोपी अद्याप फरार आहेत. �

आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश; नांदेड पोलिसांचा मोठा दणका!नायगाव च्या दुकान फोडी सह आठ घरफोड्या उघड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त – सहा आरोपींचा सहभाग, चौघे अद्याप फरार

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. सांगवी टी-पॉईंट परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी नायगाव, कुंटूर, मुदखेड, पालम, पिंपळदरी तसेच जालना आणि मुंबई परिसरात घरफोडी, दुकाने फोडणे आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगतपोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, पल्सर, अपाची आणि रॉयल एनफिल्ड बुलेटसह विविध चोरीचा ऐवज असा ₹४.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे नायगावसह अनेक भागांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

चार आरोपी फरार; शोधमोहीम सुरू आहे.

चौकटपंधरा दिवसात चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यशखाकी वर्दीचा अभिमान व गर्व वाढला”दुकानांचे शटर फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या; मात्र फरार आरोपी केव्हा जेरबंद होणार, याकडे नायगावकरांचे लक्ष लागले आहे.”आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button