
नरसी :
:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नरसी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा हा सोहळा मान्यवर, महिला, युवक, विद्यार्थी आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत दिमाखात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध लढणाऱ्या कष्टकरी, उपेक्षित व वंचित समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांनी दिलेला समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही समाजाला नवी दिशा देणारा आहे. त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.कार्यक्रमाच्या प्रारंभी राजेश पाटील भिलवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. घोषणांच्या गजरात उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांना मानवंदना देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.अध्यक्षीय भाषणात संभाजी पाटील भिलवंडे यांनी गरिबी ही यशाच्या आड येत नसल्याचे सांगत, जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास घडविता येतो, हे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनातून सिद्ध केल्याचे नमूद केले. त्यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. शिक्षण, संविधानिक मूल्ये, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा स्वीकार करून जात, धर्म आणि भाषेच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, माजी उपसरपंच मोहनराव पाटील भिलवंडे, सरपंच गजानन पाटील भिलवंडे, माजी सरपंच एन. डी. नरसीकर, ग्रामपंचायत अधिकारी यरसनवार, मधुकर पाटील ताटे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक परगेवार, ग्रामपंचायत सदस्य पपन गायकवाड, संभाजी मिसे, राजू सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, शाम गायकवाड, लालबा सूर्यवंशी, अनिल बोधने, विजय सूर्यवंशी, समाजसेवक संतोष कुडके, जळबा सूर्यवंशी, मनीषाताई नरसीकर, रेड्डी मॅडम, गजानन पाटे, पत्रकार लक्ष्मण बरगे, गोविंद नरसीकर, सुभाष सूर्यवंशी, स. आजीम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात अनेक मान्यवर व विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यावर मनोगते व्यक्त केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.चौकट : कार्यक्रमासाठी परिश्रमकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक सूर्यवंशी, गुंडेराव सूर्यवंशी, मंडळाचे अध्यक्ष गोविंदा सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, बाबू सूर्यवंशी, साईनाथ सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, केरबा सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, साईनाथ दिलीप सूर्यवंशी, बंटी नरसीकर, पप्पू सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, भंडारे महाराज, दीपक सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, नागू सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, विजय गायकवाड, पंढरी सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी आणि पंचफुलाबाई सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शाम गायकवाड व लालबा सूर्यवंशी यांनी केले. “समता आणि सामाजिक न्यायाचा संकल्पया जयंती सोहळ्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि माणुसकीच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. उत्स्फूर्त जनसहभागामुळे हा सोहळा नरसीच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासातील संस्मरणीय ठरला.
