Uncategorizedताज्या बातम्यानांदेडप्रशासकीय

१८ महिन्यांची मुदत कधीची संपली; तरी माहूरचा स्कायवॉक अधांतरीच! गडकरींच्या ‘एक वर्षात काम पूर्ण करा’ या सूचनेचे काय झाले?!.

५१ कोटींच्या प्रकल्पाला विलंब का? प्रशासन व कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!.

माहूर : – जयकुमार अडकीने तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिर परिसरातील वृद्ध, दिव्यांग व भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या गेलेल्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे काम आजही पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, २० मे २०२३ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराला स्पष्ट शब्दांत “हे काम एक १८ महिन्यात पूर्ण करा; मी १८ महिन्याने पुन्हा माहूरला येईन आणि स्कायवॉकने गडावर जाईन,” अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, गडकरी यांनी दिलेली१८ महिन्याची मुदत तर केव्हाच उलटून गेली; संबंधित प्रकल्पासाठी निश्चित केलेली १८ महिन्यांची कालमर्यादाही संपून बराच काळ लोटला, तरी माहूरकर आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना स्कायवॉकचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आता सरळ प्रश्न उपस्थित होत आहे—नेमके काम रखडले कुठे आणि जबाबदार कोण?भूमिपूजनावेळी मोठमोठ्या घोषणा, मग प्रत्यक्ष काम कुठे?२० मे २०२३ रोजी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून वनविभागाची आवश्यक संमतीही मिळाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी कोणतीही मोठी अडचण शिल्लक नसल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. स्वतः केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या कामाला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित करत इतक्या छोट्या कामासाठी १८ महिन्यांची मुदत कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी दिल्ली-मुंबई महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांचा संदर्भ देत स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. आज मात्र परिस्थिती अशी आहे की, वर्षाची मुदत तर दूरच; १८ महिन्यांची मुदत संपल्यानंतरही प्रकल्पाचा अपेक्षित लाभ भाविकांना मिळालेला नाही.५१ कोटींचा प्रकल्प; ५१ कोटी रुपयांचा लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्प आहे. कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची नेमकी अंतिम तारीख कोणती होती?• आतापर्यंत कामाची प्रत्यक्ष प्रगती किती टक्के झाली आहे?• आतापर्यंत कंत्राटदाराला किती रक्कम अदा करण्यात आली?• मुदतवाढ दिली असल्यास ती कोणत्या कारणाने आणि कोणत्या आदेशाने दिली?• विलंबासाठी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई अथवा दंड करण्यात आला आहे का?• कामाची सुधारित अंतिम मुदत काय आहे?• प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता नेमका किती निधी आवश्यक आहे?या प्रश्नांची अधिकृत उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक आहे.गडकरींच्या शब्दांचीही किंमत आहे!भूमिपूजनाच्या वेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कंत्राटदाराला सार्वजनिक व्यासपीठावरून काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. काम व्यवस्थित झाले नाही तर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. मग आज प्रश्न असा आहे की, त्या इशाऱ्याचे पुढे काय झाले? जर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दिलेली सार्वजनिक आश्वासने आणि वेळेची मर्यादा पाळली जात नसेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे? भूमिपूजनाच्या दिवशी टाळ्यांचा कडकडाट आणि आज कामाच्या विलंबावर शांतता—हा प्रकार माहूरच्या जनतेला मान्य आहे का?भाविकांच्या सुविधेचा प्रकल्प की फक्त आश्वासनांचा पूल?माहूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी येतात. वृद्ध, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना गडावर जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्कायवॉक व लिफ्ट प्रकल्पाची संकल्पना पुढे आली.मात्र, ज्यांच्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे, त्यांनाच तो कधी मिळणार? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.विकासकामांची घोषणा करणे सोपे आहे; भूमिपूजन करणे त्याहून सोपे आहे. पण मंजूर निधीतून प्रत्यक्ष, दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत आणणे ही खरी कसोटी आहे.आता ‘भूमिपूजन’ नव्हे, ‘लोकार्पणाची तारीख’ सांगा!माहूरकरांना आता नवीन आश्वासने नकोत. नवीन घोषणा नकोत. पुन्हा भूमिपूजनाच्या आठवणी नकोत.माहूरच्या जनतेला आता फक्त एकच उत्तर हवे आहे. स्कायवॉक नेमका कधी सुरू होणार?सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदार आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व यंत्रणांनी प्रकल्पाची सद्यस्थिती, खर्च, कामाची टक्केवारी, विलंबाचे कारण आणि पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी.२० मे २०२३ रोजी “एक वर्षात काम पूर्ण करा” असे सांगण्यात आले होते. त्यानंतर १८ महिन्यांची मुदतही संपली. तरीही काम पूर्ण झाले नसेल, तर हा केवळ विलंब नाही; तर जनतेच्या अपेक्षांची आणि सार्वजनिक पैशांची जबाबदारी निश्चित करण्याचा विषय आहे.माहूरकरांचा सवाल स्पष्ट आहे- “गडकरी साहेबांनी दिलेली मुदत संपली, कंत्राटदाराची मुदत संपली; आता माहूरच्या जनतेला स्कायवॉक कधी मिळणार?” भूमिपूजनाला तीन वर्षांहून अधिक काळ उलटला; आता लोकार्पणाची तारीख जाहीर करा अशी रेणुकामातेच्या लाखो भावकाकडून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button